हळदी कुंकू समारंभ
                            वैश्य समाज, मुंबई : स्थापना
सन १९७२ सालीच वैश्य समाजास ५० वर्षे पूर्ण झाली. परंतु अनेक अडचणीमुळे सदरहू सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम सन १९७६ मध्ये आला. तसेच हिरक महोत्सव सन १९९८ मध्ये साजरा करण्यात आला. ह्या कालावधीत ज्या जातीबांधवांनी समाजसेवा केली त्यांच्या मुळेच सन २०२२ रोजी शतक महोत्सवी वर्ष आम्ही साजरे करु शकलो. त्या सर्वांना शतशा धन्यवाद... सन १९७६ पूर्वी असलेली समाजाची स्थिती फारशी समाधानकारक नव्हती. ह्या कालावधीत समाज टिकवून ठेवण्याचे काम, सर्वस्वी, स.बा. महाडेश्श्वर, शरद सापळे, एकनाथ फोंडके, कमलाकांत कुशे, रामकृष्ण गाड, व्ही. आर. बांदेकर, वसंत पेडणेकर यांनी केली. सुवर्ण महोत्सवानंतर आलेल्या सर्वश्री मोहन आळवे, श्री. भास्कर लाड, श्री. अशोक पारकर इत्यादीनी वैश्य युवक आघाडी काढून वैश्य समाजाचे काम जोमाने पुढे सुरु केले. गेली ५० वर्षे म्हणजे सन २०२२ पर्यंतच्या इतिहासातील ठळक वैशिष्ठे म्हणजे कुडाळ देशस्थ वैश्य समाजाला सुपारी बाग ह्या जागेच्या ऐवजी मुंबई कार्पोरेशन कडून लिजवर मिळालेली बोरीवली येथील तीन मजली इमारत, वैश्य सहाय्यक मंडळाकडून मिळेलेली पानवाला चाळ, लालबाग येथील जागा, तसेच श्री. पेम याच्या प्रयत्नामुळे वैश्य समाजाने खरेदी केलेली कांत मॅन्शन येथील जागा. ज्या इमारतीची पुर्नबांधणी होऊन नव्याने मालकी हक्काने मिळालेली ६०० चौ. फुटाची जागा. ह्या काळखंडात वैश्य समाजाने शेती व व्यापारापेक्षा शिक्षणाला जास्त महत्त्व देऊन शैक्षणिक बाबतीत सर्वांगीण प्रगती केली आहे. वैश्य समाजातील ज्ञाती बांधव परदेशी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ लागले. डॉक्टर, इंजिनीयर, प्राध्यापिक, पत्रकार, ग्रंथक, लेखक, नाटककार, प्रकाशक, संपादक, उदयोगपती या सर्व क्षेत्रात प्रगती करुन शासन दरबारी वरिष्ठ पदावर विराजमान झाले आहेत. राजकीय शैक्षणिक व आर्थिक आघाडीवर समाज वाटचाल करीत आहे.
अधिक जाणून घ्या- 
                                
 - 
                                
वर-वधू मेळावा
 - 
                                
गायनाचा कार्यक्रम
 - 
                                
दसरा संमेलन
 
     
                      
     
                          
                