वैश्य समाज मुंबई
समाज कल्याण केंद्र इतिहास
आमची नवीन कार्यकारीणी “वैश्य समाज, मुंबई" २००१ साली कार्यरत झाली. आम्ही सर्व जुन्या गोष्टी राहून गेल्या होत्या त्यांचा मागोवा घेतला. आमची जागा जी.सी.टी.स. प्लॉट नं १३८-१३९. सुपारीबाग इस्टेट, स्कीम न. ३१, परळ व्हीलेज एफ/ दक्षिण विभाग येथे होती. ही जागा तत्कालीन सुधार समिती, बृहन महानगरपालिका ह्यांनी ठराव क्र. ९९ दिनांक ११/०६/१९४६ चंद्र सूर्य असेपर्यंत रुपये १/- ह्या भाडेतत्वावर दिली होती, त्याप्रमाणे रुपये ३४९६/- व रुपये ३३६१/- ठेव म्हणून भरले आणि लीज अँग्रीमेंट त्यावेळचे उपायुक्त (सुधार) व आमचे तत्कालीन अध्यक्ष, वैश्य समाज मुंबई ह्यांच्या स्वाक्षरीने १५ जुलै १९४६ रोजी झाले. ही फाईल आमच्या हातात आल्यावर आम्ही दिनांक ७ मे २००३ रोजी महापौर मा. श्री. महादेव देवळे यांच्या दालनात एक सभा लावली. त्यात श्री. महादेव देवळे, महापौर तसेच श्री. आर.ए. राजीव, महापालिका सह आयुक्त (सुधार) श्री. अरविंद हिरे सहाय्यक आयुक्त महापालिका (मालमत्ता) श्री. सी. के वाटवे, कार्यकारी अधिकारी (विकास नियोजन शहर) वैश्य समाज अध्यक्ष श्री. दिगंबर सोहनी, कार्यकारी विश्वस्त चंद्रकांत सदडेकर, कार्यकारी विश्वस्त श्री शरद फोंडणे, विश्वस्त गुरुनाथ पांगम, कार्याध्यक्ष श्री. एकनाथ फोंडगे, सचिव श्री. सुरेश लाड हजर होते.
                            
                            
                            त्यात आमच्या जागे बद्दल जो आमच्यावर आतापर्यंत अन्याय झाला त्याच्यावर
                            का. विश्वस्त श्री. चंद्रकांत सदडेकर व श्री. शरद फोंडगे, ह्यांनी आपले
                            सडेतोड विचार मांडले. तेव्हा महापौर मा. महादेव देवळे ह्यांनी निर्णय
                            देताना समायोजन आरक्षण तत्वानुसार समाज कल्याण केंद्राचे बांधकाम करून
                            महापालिकेच्या ताब्यात देण्यात येते, अशा केंद्रासाठी वैश्य समाज मुंबई
                            ने मा. महापौरांकडे अर्ज करावा. संस्थेला समाज कल्याण केंद्र
                            देण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल असे सुचवले. त्याप्रमाणे आम्ही
                            दरवेळी नवीन येणाऱ्या महापौरांकडे अर्ज करीत राहीलो उदा. दत्ता साळवी -
                            सैौ. श्रद्धा जाधव, सौ. डॉ. शुभ राहुळ व सरते शेवटी महापौर श्री. सुनिल
                            प्रभु ह्यांना मी फोनवर वैश्य समाज मुंबईच्या संस्थेवर खरोखरच गेले ५०
                            वर्षे अन्याय झाला आहे तरी आयुक्तांबरोबर सभा घेऊन त्यांना न्याय
                            द्यावा असे सांगितले.
                            
                            त्यानंतर २०१२ च्या दसरा संम्मेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मा. महापौर
                            श्री. सुनिल प्रभू यांना हजर राहून आम्हा वैश्य समाज मुंबईला आश्वासन
                            दिले व सदर कामाला सुरवात झाली कारण मध्यंतरीच्या काळात आम्ही तीनदा
                            निवीदा भरुन देखील महानगर पालिकेने आमच्या वर अन्याय केला होता हे मा.
                            सुनिल प्रक्षु महापौर यांच्या लक्षात आले होते. म्हणून त्यांनी पुन्हा
                            एक अर्ज आयुक्तांच्या नावे द्या मी त्याचा पाठपुरावा करेन असे आश्वासन
                            दिले.
                        
                            मा. आयुक्त मुंबई महानगरपालिका यांना मा. श्री जयंत शिरसाट विश्वस्त
                            यांनी दि. ८ ऑगस्ट २०१३ रोजी एक पत्र दिले होते. त्या पत्रावर मा.
                            श्री. एकनाथजी फोंडके, अध्यक्ष मा. श्री. शरद फोंडगे, का. विश्वस्त व
                            श्री. सुरेश लाड, कार्याध्यक्ष अशा चौघांनी सह्या केल्या होत्या.
                            
                            सदर पत्राच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त (मालमचा) यांचे कार्यालय
                            बृहन्मुंबई, महानगर- पालिका, मुख्य कार्यालय, विस्तारित इमारत, ४ था
                            मजला, फोर्ट, मुंबई - ४०० ००१, यांजकडून वैश्य समाज मुंबई अध्यक्ष
                            यांना दि.०८/०९/२०१५ रोजी एक मंजुरीचे पत्र क्र. सआ/ मालमत्ताय १०६५० य
                            मक्ता- ५ आले, त्यात खालील मजकूर दिला आहे.
                            
                            १) गट नेत्यांच्या दि. २९/०६/२०१५ रोजीच्या सभेतील विषय क्र. ५
                            अन्वयेची मंजुरी. 
                            २) महानगर पालिका आयुक्त यांची मंजुरी क्र. एमजीसी /एम/ (७३४४, दि.
                            १०/०८/२०१५. 
                            ३) सुधार समिती ठराव क्र. ७४. दि.२७/०८/२०१५ व महापौर सभेत महापालिका
                            ठराव क्र. ६७९, दि. २८/०८/२०१५ मंजुर.
                            
                            वरील सर्व मंजुरी नंतर महानगर पालिका सहाय्यक आयुक्त ( मालमत्ता )
                            यांनी वैश्य समाज मुंबई ह्या आपल्या संस्थेत भूभाग क्र. ७८ /अ/१ (भाग),
                            गाव मागाठणे, बोरीवली (पूर्व) येथील ६२४.१५ चौ.मी. क्षेत्रफळाचे समाज
                            कल्याण केंद्राचे वाटप काही अटी व शर्तीवर ५ वर्षासाठी वार्षिक
                            अनुज्ञापन शुल्क रुपये ६२,४१५/- व दोन वर्षाच्या अनुज्ञापन शुल्क ऐवढी
                            सुरक्षा अनामत रक्कम रुपये १,२४,८३०/- आकारले आहे. सदर रक्कम आपण
                            दिनांक ११/०९/२०१५ रोजी मालमत्ता विभागात जमा केली आहे, तसे पत्र
                            त्यांना दिले आहे. लवकरात लवकर विधी विभागाकडून जागेचा करार नामा
                            सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) व वैश्य समाज मुंबई यांच्यात होईल.
                            
                            अध्यक्ष श्री. एकनाथजी फोंडके व कार्याध्यक्ष श्री. सुरेश लाड यांनी
                            दि. २१/०२/२०१४ रोजी महापौर श्री. सुनिल प्रभु यांना पाठविलेल्या
                            पत्रानुसार आपल्या बोरीवलीच्या जागेचा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेपुढे
                            ठेवण्यास मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना सांगितले. त्याप्रमाणे वरील
                            कारवाई करण्यात आली. विश्वस्त श्री जयंत शिरसाट ह्यांनी दि. १०/०८/२०१५
                            रोजी श्री. आशिष शेलार, आमदार, भाजपा अध्यक्ष, मुंबई यांच्या
                            मध्यस्थीने महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात सभा आयोजित केली.
                            त्या सभेत श्री सिताराम कुंटे, आयुक्त, मनपा, मा. आमदार श्री. आशिष
                            शेलार, विश्वस्त श्री. जयंत शिरसाट, कार्याध्यक्ष श्री. सुरेश लाड,
                            माजी नगरसेवक श्री. भालचंद्र शिरसाट तसेच, महानगरपालिका सहाय्यक आयुक्त
                            ( मालमत्ता) श्री. शंकर वार व सुधार समिती मनपा सहाय्यक आयुक्त श्री.
                            क्षिरसागर हजर होते व ह्या सभेत सर्वांच्या संमतीने वैश्य समाज मुंबई
                            ह्या संस्थेस बोरीवली येथील समाज कल्याण केंद्र देण्याचे मान्य केले.
                            तसेच वरील ठराव गटनेत्यांच्या सभेपुढे गटनेत्या सौ. तृष्णा विश्वासराव
                            व मा. महापौर सौ. स्नेहर आंबेकर व श्री यशोधर (शैलेश ) फणसे, अध्यक्ष,
                            स्थायी समिती ह्या सर्वानी सदर ठराव गटनेत्यांच्या सभेत दि. २९/०६/२०१५
                            रोजी मंजूर करुन घेतला व सदर ठराव क्र. ४ / ब / २४१ पास करुन घेतला.
                            ह्या सर्व कार्यात विश्वस्त श्री. जयंत शिरसाट यांचा सिंहाचा वाटा आहे.
                            त्याचप्रमाणे श्री. अशोक पारकर, विश्वस्त, श्री. महादेव सोहनी व श्री.
                            विजय छेडा यांनी महानगरपालिकेतील कामकाजात मदत केली.
                            
                            सदर ठरावासाठी श्री. अनंत (बाळा) नर, शिवसेना नगरसेवक (जोगेश्वरी)
                            स्थापत्य समिति सभासद, बृहन्मुंबई महानगरपालिका व श्री. सुरेश लाड,
                            कार्याध्यक्ष हयांनी दि. १७/०९/२०१४ रोजी वरील महापालिका समाज कल्याण
                            केंद्र मिळण्या- बाबतच्या ठरावासाठी पाठपुरावठा करण्यासाठी विनंती अर्ज
                            दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी ताबडतोब महापौर, सभागृह नेत्या व
                            अध्यक्ष स्थायी समिती ह्यांना पत्र दिले. तसेच, ते मला स्वतः सहाय्यक
                            आयुक्त श्री. शंकर वार ह्यांच्याकडे घेऊन गेले व पुढील सर्व कारवाई
                            सुरू झाली. त्याचप्रमाणे, स्थानिक नगरसेवक विभाग क्र. १३ श्री. चेतन
                            चंद्रकांत कदम, मनसे नगरसेवक, श्री. सुरेश लाड, कार्याध्यक्ष ह्यांच्या
                            विनंतीस मान देऊन श्री. चेतन कदम, श्री. शंकर वार, सहाय्यक आयुक्त
                            (मालमत्ता), मनपा ह्यांना वैश्य समाज मुंबईस सदर महानगरपालिका समाज
                            कल्याण केंद्र देण्यास पत्र दिले. ह्या सर्वाचे तसेच हस्ते पर हस्ते
                            ज्यांनी ज्यांनी आम्हाला या कामासाठी मदत केली त्यासर्वांचे आम्ही
                            वैश्य समाज मुंबई विश्वस्थ व कार्यकारी मंडळ आभारी आहोत. सध्या आपल्या
                            वैश्य वाणी समाजाची जी भरभराट २००४ पासून सुरू आहे. त्याचे मुख्य
                            केंद्र बिंदू श्री. शांताश्रम मठ हळदीपुर येथील देवता श्री लक्ष्मी
                            नरसिंह दुर्गा परमेश्वरी चंद्रमौळीश्वर व परमपूज्य श्री. श्री.
                            वामनाश्रम महास्वामीजींच्या संपूर्ण कृपा आशिर्वादाने होत आहे.
                            
                            
                                श्री. सुरेश लाड 
                                कार्याध्यक्ष
                            
                            
                            
                                वैश्य गुरू श्री. श्री. वामनाश्रम महास्वामीजींना साष्टांग नमस्कार.
                            
                        
